ThaneTeam Lokshahi
ताज्या बातम्या
ठाण्यातील सिलिका सायंटिफिक कंपनीला भीषण आग
ठाण्यातील सिलिका सायंटिफिक कंपनीत ८ ते ९ सिलेंडरचे स्फोट
अंबिका नगर २, वागळे इस्टेट, ठाणे(प.) या ठिकाणी रोड नंबर २९ मध्ये प्लॉट नंबर ए-२०२ सिलिका सायंटिफिक (मालक: अक्षय कदम) या प्रयोगशाळेतील सामान तयार करण्याचा कंपनीमध्ये ही आग लागली.
शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही आग लागली असून अवघ्या अर्ध्या तासामध्ये याठिकाणी एकूण पाच स्फोट झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून रात्री उशीरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.