ताज्या बातम्या
Girls Hostel Fire : ग्रेटर नोएडामधील मुलींच्या वसतीगृहाला आग, विद्यार्थिनी जखमी
त्यामुळे आतमध्ये फसलेल्या विद्यार्थीना बाहेर पडण्यासाठी धावपळ केली आहे.
ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्क स्थित अन्नपूर्णा गर्ल्स हॉस्टेलमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. या ठिकाणी कम्प्रेसर फुटल्याने भीषण आग लागली आहे.दरम्यान आग लागल्यानंतर संपूर्ण धूर इमारतीमध्ये पसरला आहे. त्यामुळे आतमध्ये फसलेल्या विद्यार्थीना बाहेर पडण्यासाठी धावपळ केली आहे. आग लागल्यानंतर लगेचच आतमध्ये अडकलेल्या विद्यार्थीनींनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सर्व ठिकाणी धावपळ सुरु केली.
हॉस्टेलला आग लागल्यानंतर त्यातून 160 विद्यार्थिनींना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. तसेच आगीवर नियंत्रणदेखील मिळवले आहे. मात्र या सगळ्यामध्ये आग लागल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या एका विद्यार्थिनीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खाली उडी मारली मात्र यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली असून तिला रुग्णालयात भरती केले आहे .