Fire breaks out in a building in Thane
Fire breaks out in a building in Thane

Thane Fire : ठाण्यात तीन मजली इमारतीला आग

सेंट जॉन स्कूलच्या समोर असलेल्या तळ अधिक तीन मजली गुरूप्रेरणा या इमारतीमध्ये आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागली.

ठाणे : शुभम कोळी | ठाण्यातील नौपाडा येथील सेंट जॉन स्कूलच्या समोर असणाऱ्या गुरूप्रेरणा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली.या आगीमुळे इमारतीत अडकलेल्या 15 जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत त्यांची सुखरूप सुटका केली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांचे मार्फत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान 03-फायर वाहन व 01-रेस्क्यू वाहन व 01-वॉटर टँकरसह, 01- जंबो वॉटर टँकरला पाचारण केले आहे.

Fire breaks out in a building in Thane
असा आहे 'बिग बॉस 16' चा रनर अप मराठमोळ्या शिवचा खडतर प्रवास...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com