Mumbai Fire :  महिमच्या नवरंग कंपाउंडमध्ये आग लागल्याची घटना...जिवितहानीच वृत्त् नाही

Mumbai Fire : महिमच्या नवरंग कंपाउंडमध्ये आग लागल्याची घटना...जिवितहानीच वृत्त् नाही

शनिवारी, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी धारावीच्या ६० फूट रोडवरील सेनापती बापट रोडजवळील माहीम रेल्वे फाटक आणि नूर रेस्टॉरंटजवळील नवरंग कंपाउंडमध्ये भीषण आग लागल्याने मुंबई लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

शनिवारी, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी धारावीच्या ६० फूट रोडवरील सेनापती बापट रोडजवळील माहीम रेल्वे फाटक आणि नूर रेस्टॉरंटजवळील नवरंग कंपाउंडमध्ये भीषण आग लागल्याने मुंबई लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली. मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) दुपारी १२.३२ वाजता लेव्हल-१ आगीची घोषणा केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आग विझविण्यासाठी दादर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिवाजी पार्क अग्निशमन केंद्रांमधून एमएफबीच्या किमान चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. एमएफबीने पोलिस, १०८ रुग्णवाहिका आणि बीएमसीच्या वॉर्ड कर्मचाऱ्यांसह त्यांच्या पथकांना तातडीने तैनात केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com