मुंबईतल्या वाडिया रुग्णालयात आग; अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल

मुंबईतल्या वाडिया रुग्णालयात आग; अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल

पहिल्या मजल्यावरील ऑपरेशन थेटरमध्ये काही कारणांमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतल्या वाडिया रुग्णालयात आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतापर्यंत अग्निशमन दलाच्या आठ गाड्या त्याठिकाणी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या मजल्यावरील ऑपरेशन थेटरमध्ये काही कारणांमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. हे ऑपरेशन थेटर बंद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या रुग्णालयात लहान मुलांवर उपचार केले जातात, त्यामुळे चिंता वाढली आहे.

Lokshahi
www.lokshahi.com