मुंबईकरांची एसी डबलडेकर ई-बसची प्रतीक्षा संपली; आज बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार

मुंबईकरांची एसी डबलडेकर ई-बसची प्रतीक्षा संपली; आज बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार

भारतातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारतातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. . इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस आज बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहे. सुरुवातीला केवळ पाच बसेस प्रायोगिक तत्त्वावर मुंबईच्या रस्त्यांवर धावतील. मार्च अखेरपर्यंत मुंबईतील विविध रस्त्यांवर तब्बल 200 एसी डबल डेकर ई बस रुजू करण्याची योजना असल्याचं 'बेस्ट'चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी सांगितलंय.

बेस्टच्या डबल डेकर बस चालविण्यासाठी बेस्टने मार्गांची निवड केली आहे. कुलाबा, मजास, आणि कुर्ला डेपोत या बसेस उभ्या करण्याची सोय करण्याची योजना आहे. बेस्टच्या डीझेल इंधनावरील डबल डेकर चालल्या होत्या, त्याच पारंपारिक मार्गांवर प्रायोगिक तत्वावर नव्या इलेक्ट्रीक बस चालविण्याची योजना आहे. बस जशा टप्प्या टप्प्याने दाखल होतील तशा त्यांच्या पारंपारीक मार्गांवर दाखल होताल, त्यासाठी कुलाबा, मजास, आणि कुर्ला आगारांत बसेसच्या चार्जिंग पॉईंटची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

नव्या ई- डबल डेकरमध्ये 78 प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था आहे. या बसेसना दोन दरवाजे आहेत. या बसेसची रंगसंगती आकर्षक असून या बसेस लंडनच्या स्विच मोबिलीटी या कंपनीच्या असून भारतात त्यांनी हिंदूजा ग्रुप बरोबर करार केला आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात प्रिमियम बसेससह 410 ई – बसेस आहेत. काही दिवसांपूर्वी सुमारे 50 हजार कोटींचा मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात बेस्टच्या ताफ्यात तीन हजार नविन इलेक्ट्रीक बसेस सामाविष्ट करण्याची बेस्टची योजना असल्याचे म्हटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com