आधी विस्तार केंद्रातला मगच महाराष्ट्रातला?
चेतन ननावरे, मुंबई
राज्यात शिवसेना आमदारांकडून मंत्री मंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आले असताना भाजपाच्या गोटात मात्र कमालीची चुप्पी दिसत आहे. केंद्रीय मंत्री मंडळ विस्ताराशिवाय राज्यात मंत्री मंडळ विस्तार होणार नसल्याची खात्रीलायक माहिती युती सरकारमधील वरिष्ठ सूत्रांनी लोकशाहीला दिली आहे.
त्यामुळे भाजपावर मंत्री मंडळ विस्तारासाठी शिवसेना आमदारांकडून दबाव टाकला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, मंत्री मंडळ विस्ताराच्या तारखा या केवळ वावड्या असुन विस्ताराचा संपूर्ण निर्णय हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मोदी-शाह या वरिष्ठ नेत्यांच्या जोडीसोबत चर्चा करुनच जाहीर करणार असल्याचे संबंधित सूत्रांनी स्पष्ट केले. तूर्त विस्तार लांबणीवर असल्याने विविध समित्या आणि मंडळांवर शिवसेना व भाजपमधील इच्छुक व उपद्रवी नेत्यांच्या नेमणूक केल्या जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.