Devendra Fadnavis : "पहिल्यांदाच बाहेर पडले..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन मुख्यमंत्र्यांचा पलटवार

उद्धव ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात

  • उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहेत.

  • या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • "चांगला आहे उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बाहेर पडले,मला आनंद आहे." मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

(Devendra Fadnavis On Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहेत. मागील महिन्यात पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली असून, त्यांच्यासमोर पुन्हा शेती उभी करण्याचं आव्हान आहे. नव्या मातीची आणि आर्थिक मदतीची गरज तीव्रतेने जाणवत आहे. सरकारने काही हजार कोटींचं मदतपॅकेज जाहीर केलं असून, दिवाळीपूर्वी निधी वितरित करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात किती रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पोहोचली हे तपासण्यासाठी ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

त्यावेळी ते म्हणाले की, "चांगला आहे उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बाहेर पडले,मला आनंद आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काही करू शकत नाहीत. मी यापूर्वी सांगितले आहे विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com