'वाघीणी'साठी पाच पिंजरे तैनात, वनविभाग 'वेट अ‍ॅण्ड वॉच'च्या भूमिकेत

'वाघीणी'साठी पाच पिंजरे तैनात, वनविभाग 'वेट अ‍ॅण्ड वॉच'च्या भूमिकेत

वाघिणीला पिंजराबंद करण्याचे आदेश; बारा चमूचे युद्धपातळीवर प्रयत्न
Published on

भूपेश बारंगे | वर्धा : राज्यातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प असलेला बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख आहेत. या प्रकल्पात राणी अशी ओळख असलेल्या एका वाघिणीची मुलगी हिला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न केले जात आहे. यासाठी नुकतेच वरिष्ठांनी आदेश काढले असून 12 चमू त्यासाठी प्रयत्न केरत आहेत. यासाठी पाच पिंजरे लावण्यात आले आहेत.

वाघिणीचा पाठलाग करण्यासाठी आतापर्यंत 45 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून यातील फक्त तीन कॅमेऱ्यात वाघीण कैद झाली आहे. मात्र, ही वाघीण अजूनही वनविभागाला हुलकावणी देत आहे. यासाठी पाच पिंजऱ्यात पाळीव जनावरे बांधून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी 'वेट अॅड वॉच' च्या भूमिकेत आहेत. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या तिन चमू तर प्रादेशिक वनविभागाच्या तब्बल नऊ चमू युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.

पाळीव जनावरांना ठार केल्यावर परतली दाट जंगलात

वाघिणीचे कारंजा तालुक्यातील बांगडापूर परिसरात हल्ल्याच्या घटनेत वाढ होत आहे. यात बांगडापूर जोगा जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी पाळीव जनावरांची शिकार केली. पण, वाघिणीने या जनावराचा पूर्णतः फस्त केले नसल्याने ती शिकार खाण्यासाठी पुन्हा येईल, असा अंदाज वनविभागाला होता. त्यामुळे सुरुवातीला या ठिकाणावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वॉच ठेवला. शिवाय कॅमेरेही लावले. पण, ती येथे एकदा परतली असून ती ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पण, पुन्हा ती परत आली नसून तिचा अद्यापही शोध लागला नाही. कारंजा तालुक्यातील दाट जंगलात ती परत गेल्याचे सांगण्यात येत आहे. तिला पिंजराबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.

ट्रॅप ,ड्रोन कॅमेऱ्यांसह पाच पिंजरावर वॉच

ज्या परिसरात वाघिणीला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला आहे. त्यासह इतर परिसरावर 45 ट्रॅप आणि ड्रोन कॅमेऱ्याद्वारे वॉच ठेवला जात आहे. तर पाच पिंजरा लावण्यात आले आहे. यातील तीन कॅमेऱ्यात वाघीण कैद झाली आहे. प्रादेशिक वनविभाग आणि बोर व्याघ्र प्रशासनाच्या चमू तिचे ठोस लोकेशन घेत आहे. काही ठिकाणी तिचे पगमार्ग आढळले आहे.

जंगलव्याप्त परिसरामुळे अडचणी

वाघिणीला जेरबंद करण्यासाठी ट्रेनगुलेशन केले जाणार आहे. त्याकरिता पाच लोकांच पथक आहे. त्यांच्याकडे दोन गण आहे. वाघिणीच्या लोकेशनवर उंच झाडावर बाजींचे मचांग बांधले असून त्याठिकाणावरून वाघिणीवर लक्ष ठेवून असून तेथून ट्रेनगुलेशन केले जाणार आहे.

गावकऱ्यांची मदत ठरेल महत्वाचे

वाघिणीला पिंजराबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करत असून रात्र दिवस वाघिणीवर पाळत ठेवून आहे. इतकेच नाही तर जंगलात सापळाही लावण्यात आला आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी गावागावात जात खबरदारीच्या सूचना देत पत्रक वाटण्यात आले आहे. याच सूचनांचे गावकऱ्यांनी काटेकोरपणे पालन केल्यास व सहकार्याने वाघिणीला वेळीच पिंजराबंद करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. मानव - वन्यजीव संघर्ष टाळावा या हेतूने कारंजा तालुक्यातील विविध भागांतील नागरिकांनी वनविभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुचनेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com