ताज्या बातम्या
Godavari river tragedy : आताची मोठी बातमी, इंद्रायणीनंतर गोदावरी पात्रात बुडून 5 भाविकांचा मृत्यू
तेलंगणातील बासर येथील श्री सरस्वती देवस्थान येथे दर्शनासाठी गेलेल्या तेलंगणा राज्यातील पाच भाविकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीवरील एक जुना लोखंडी पूल रविवारी दुपारी अचानक कोसळला. या दुर्घटनेत सुमारे 20 ते 25 पर्यटक नदीत वाहून गेले असून, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अशातच आता नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणातील बासर येथील श्री सरस्वती देवस्थान येथे दर्शनासाठी गेलेल्या तेलंगणा राज्यातील पाच भाविकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
हैदराबाद मधील चिंतल बाजार येथील एकाच कुटुंबातील 18 जण आले होते. दर्शनापूर्वी गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.