Independence Day: स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात मेड इन इंडियाच्या हेलिकॉप्टरमधून करणार पुष्पवृष्टी

Independence Day: स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात मेड इन इंडियाच्या हेलिकॉप्टरमधून करणार पुष्पवृष्टी

लाल किल्ल्यावरील मुख्य स्वातंत्र्य दिनाच्या समारोहाप्रसंगी फुलांचा वर्षाव करण्याची परंपरा 2021 मध्ये सुरू झाली होती.
Published by  :
Siddhi Naringrekar

लाल किल्ल्यावरील मुख्य स्वातंत्र्य दिनाच्या समारोहाप्रसंगी फुलांचा वर्षाव करण्याची परंपरा 2021 मध्ये सुरू झाली होती. या स्वातंत्र्यदिनी मेड इन इंडियाच्या हेलिकॉप्टरची झलक 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात पाहायला मिळणार आहे.

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ए. भारत भूषण बाबू यांनी ट्विट करुन स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात देशभरातील विविध क्षेत्रातील सुमारे 1,800 विशेष पाहुणे सहभागी होणार असल्याची माहिती दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून सलग दहावे भाषण करणार आहेत.

यावर्षी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यासाठी दोन एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर वापरण्यात येणार आहेत.एचएएलने बनवलेले हेलिकॉप्टर ही संरक्षण क्षेत्रातील युनिटची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com