ताज्या बातम्या
Vijay Wadettiwar : नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, राज्यभरात आंदोलन
नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांच्यावर राज्यभरातून टीका, माफीची मागणी.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विविध स्तरातून त्यांच्यावर टीका केली जातंय. यावरुनच विजय वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी वडेट्टीवारांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याने तक्रार दाखल करण्यात आलीये. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अनुयायी आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तक्रार दाखल केलीये. दरम्यान नरेंद्र महाराजांच्या अनुयायांकडून वडेट्टीवारांविरोधात राज्यभर तीव्र निदर्शने करत जोडोमारो आंदोलन करण्यात आलंय.