Admin
बातम्या
माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, दगडफेक
त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या वडिलोपोर्जित घरावर हल्ला करण्यात आला आहे.
त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या वडिलोपोर्जित घरावर हल्ला करण्यात आला आहे.त्यानंतर आजूबाजूंच्या घरांनाही आग लावत दुकानेही पेटवून दिली. आज 4 जानेवारी रोजी बिप्लब देब यांच्या वडिलांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे देब हे आपल्या घरात हवन करणार होते. पुण्यतिथीच्या एक दिवस आधीच त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे.
गोमती जिल्ह्यातील उदयपूरच्या जमजुरी येथे देब यांचं घर असून या घरावर काही लोकांनी हल्ला केला. त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला जात असून पोलीस अधिक तपास करत आहेत.तोडफोड करत घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर या समाजकंटकांनी आजूबाजूच्या दुकाने आणि घरांनाही आग लावून पळ काढला.