MP Prajwal Revanna : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना दोषी, जन्मठेपेची शिक्षा
MP Prajwal Revanna : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना दोषी, जन्मठेपेची शिक्षाMP Prajwal Revanna : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना दोषी, जन्मठेपेची शिक्षा

MP Prajwal Revanna : माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना दोषी, जन्मठेपेची शिक्षा

प्रज्वल रेवन्ना दोषी: माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना बलात्कार प्रकरणात दोषी, जन्मठेपेची शिक्षा.
Published by :
Riddhi Vanne
Published on

माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांचा नातू प्रज्वल रैवन्ना यांना अखेर दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने आज आपला निर्णय जाहीर केला असून प्रज्वल रेवन्नायाला जन्मठेप करण्यात आली आहे. काल बंगळुरुच्या आमदार आणि खासदारांनी विशेष न्यायालयाने चार पैंकी एका बलात्कार प्रकरणात दोषीत ठरवले आहे, त्याला शिक्षा सुनावण्यात आली असून 10 लाख रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला आहे.

माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू असलेले प्रज्वल रेवन्ना मागील 14 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपीने कर्नाटकमधील एका फार्महाऊसमध्ये घरकाम करणाऱ्या 48 वर्षीय महिलेवर बलात्कार तसेच अनेक महिलांवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. दरम्यान 2021 मध्ये त्याच पीडितेवर दोनदा बलात्कार झाल्याचा आरोप असून, त्याने सर्व कृत्य मोबाईलमध्ये चित्रीत केले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी 120 साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. पीडितेच्या तक्रारीनंतर महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत. याआधारावर प्रज्वलवर कलम 506, 35 अ, ब, आणि क नुसार विविध गुन्हे दाखल केले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com