बातम्या
ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी आमदार शिंदे गटात
शिंदे सरकार ठाकरे गटाला वारंवार धक्क्यांवर धक्के देत आहे. शिवसेनेत फूट पाडल्यानंतर अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला.
शिंदे सरकार ठाकरे गटाला वारंवार धक्क्यांवर धक्के देत आहे. शिवसेनेत फूट पाडल्यानंतर अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यातच आता अजून एक मोठा धक्का ठाकरे गटाला बसला आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील विलेपार्ले भागात कृष्णा हेगडे यांचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस, भाजपा, शिवेसना अशा पक्षात त्यांनी काम केले आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटातील पक्षप्रवेश ठाकरेंसाठी मोठी धक्का मानला जात आहे.शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना शिंदे गटात उपनेतेपद आणि प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काल आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाला समर्थन दिले