मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यातच आता मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. माजी आमदार रमेश कदम यांनी लोकसभेसाठी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला आहे.

रमेश कदम यांनी मोहोळमधील सभेत आपली भूमिका जाहीर केली. या सभेत शिवसेना नेते आणि मंत्री तानाजी शिंदे उपस्थित होते.

याच पार्श्वभूमीवर रमेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रमेश कदम म्हणाले की, आपण या निवडणुकीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा पद्धतीने निर्णय करत असताना शेवटी राजकारणामध्ये भावनिक होऊन चालत नाही. असे माजी आमदार रमेश कदम म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com