MNS vs Shivsena: मनसेला मोठा धक्का! एकमेव माजी नगरसेवकही फुटला, हाती घेणार शिवधनुष्य

राजकीय उलथापालथ: मनसेचा एकमेव नगरसेवक संजय तुर्डे शिवसेनेत!
Published by :
Riddhi Vanne

गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता मात्र मुंबईत मनसेला धक्का बसला आहे. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे (Sanjay Turde) यांनी मनसे पक्षाला रामराम ठोकला आहे. संजय तुर्डे मुंबईतील कालिना विभागातून निवडून आले होते. मनसेचे मुंबईतील माजी नगरसेवक संजय तुर्डे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, सोमवारी शिवसेनेत संजय तुर्डे करतील. यांच्यासोबत कलिना परिसरातील मनसे पदाधिकारीसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

कोण आहेत संजय तुर्डे?

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंचा पक्ष मनसेचे एकुण 7 उमेद्वार विजयी होऊन नगरसेवक बनले. यामध्ये माजी नगरसेवक दिलीप लांडे, परमेश्वर कदम, अश्विनी माटेकर, डॉ. अर्चना भालेराव, हर्षला मारे, दत्ता नरवणकर, या सहा नगरसेवकांनी प्रवेश केला होता. यानंतर अनेकांनी पक्षातंर करण्याचा विचार केले. संजय तुर्डेआ हे मात्र मनसेसोबत राहिले, त्यामुळे संजय तुर्डे हे मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com