IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या विधानसभांमध्ये थोड्या फार प्रमाणात का असेना पण प्रचाराला सुरुवात केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ऑगस्ट महिन्यात त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडत मुंबई उपनगरातील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे घोषित केले होते. पण ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार? हे स्पष्ट नव्हते. मात्र आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेस करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत राज्यात चांगलं यश मिळवलेल्या काँग्रेसने विधानसभेचीही जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या मुंबईत जास्तीत जास्त जागा लढवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्याआधीच काँग्रेसने उमेदवारांचा शोध सुरु केला आहे. राजकारणात सक्रिय होण्याच्या विचारात असलेल्या संजय पांडे यांनी काँग्रेसची निवड केली आहे.

गुन्हेगारीसंदर्भातील राज्यव्यापी इंटर-कनेक्टेड नेटवर्क उभारण्यात संजय पांडे यांचा मोलाचा वाटा होता. ज्यामुळे तपास प्रक्रिया जलद होते. पांडे यांना केंद्रीय प्रतिनियुक्तीवर देखील पाठवण्यात आले होते. जेथे ते पंतप्रधानांच्या सुरक्षा युनिटमध्ये संलग्न होते. मात्र, तपास आणि पोस्टिंगमधील राजकीय हस्तक्षेपामुळे संजय पांडे यांनी एप्रिल 2000 मध्ये सेवेचा राजीनामा दिला आणि एका खासगी कंपनीत काम करण्यास सुरुवात केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com