Abdul Najir
Abdul NajirTeam Lokshahi

अयोध्या राम मंदिर, तिहेरी तलाकवर निर्णय देणारे माजी न्यायाधीश बनले आंध्रप्रदेशचे राज्यपाल

अयोध्या खटल्याचा ऐतिहासिक निकाल देणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल करण्यात आली आहे.
Published by :
Sagar Pradhan
Published on

केंद्र सरकारने देशभरातील 13 राज्यातील राज्यपाल आणि उपराज्यपाल यांच्यात बदल केले आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहील ते महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परंतु, त्यांच्या सोबतच आणखी एक नाव चर्चेत येत आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. अब्दुल नजीर यांचे त्यांची आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती नजीर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश असताना राम मंदिर, तीन तलाक आदी महत्त्वाच्या प्रकरणावर सुनावणी झाली होती. राम मंदिराचा तिढा सोडवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाच सदस्यांच्या घटनापीठात ते देखील होते.

अयोध्या खटल्याचा ऐतिहासिक निकाल देणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल करण्यात आली आहे. ते अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाचा भाग होते. रंजन गोगोई यांच्यानंतर नजीर हे या खंडपीठाचे दुसरे न्यायाधीश आहेत, त्यांना देखील उच्चपद मिळाले आहे. अल्पसंख्याक समाजातील एकमेव न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबतच महाराष्ट्र, लडाख, सिक्कीम, झारखंड, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, बिहार, आसाम, नागालँड, मणिपूर आणि मेघालय या राज्यांमध्ये राष्ट्रपतींच्या मान्यतेने राज्यपाल बदलण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com