पुणे हादरलं; एकाच कुटुंबातील चौघांची विष पिऊन आत्महत्या
Admin

पुणे हादरलं; एकाच कुटुंबातील चौघांची विष पिऊन आत्महत्या

पुणे हादरलं आहे. पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे हादरलं आहे. पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे. पती, पत्नी आणि दोन मुलं यांनी विष प्राशन केलं. शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवल्यानंतर त्यात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं.

दीपक थोटे (वय 59), इंदू दीपक थोटे (वय 45), मुलगा ऋषिकेश दीपक थोटे (वय 24) आणि मुलगी समीक्षा दीपक थोटे (वय 17) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत.

मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या चौघांनी आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com