ताज्या बातम्या
डोंबिवलीत घरात आग लागल्याने चार जण गंभीर जखमी
घरात अचानक आग लागल्याने एका कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना डोंबिवली येथील भोपर गावात घडली आहे.
अमजद खान, कल्याण
घरात अचानक आग लागल्याने एका कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना डोंबिवली येथील भोपर गावात घडली आहे. आग कशामुळे लागली हे अजून कळू शकले नाही मात्र जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
आज पहाटे पाचच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील भोपरगावात राहणारे प्रसाद पाटील यांच्या घरात अचानक आग लागली. या आगीत त्यांची पत्नी प्रीती त्यांची दोन मुली समीरा आणि समीक्षा या भाजल्या आहेत. प्रसाद पाटील हे देखील भाजले आहेत. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना डोंबिवलीतील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. आज कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.