इन्शुरन्स पॉलीसी मॅच्युरीटीचे आमिष दाखवून करोडोची फसवणुक

इन्शुरन्स पॉलीसी मॅच्युरीटीचे आमिष दाखवून करोडोची फसवणुक

दिल्लीतील टोळीला मुंबईच्या पूर्व प्रादेशिक सायबर पोलीसांनी तिघांना अटक
Published by :
Sagar Pradhan

रिद्धेश हातिम|मुंबई :  मागच्या काही दिवसापासून सायबर क्राईम मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या दरम्यान दिल्लीतील नोएडा येथील एक कॉल सेंटर कंपनी फोन करून ज्येष्ठ नागरिकांना इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युरीटीचे करोडो रुपयांचे आमिष दाखवून गंडा घालणारे टोळी सक्रिय झाली होती.

मुंबई च्या एका ड्राय फ्रुट होलसेल व्यापारी यांना अनोळखी नंबर वरून फोन करून त्यांना सांगितले की तुमची इन्शुरन्स पॉलिसी मॅच्युर झाली आहे आणि नंतर मिळणारी रक्कम कमी आहे ती पॉलिसी रद्द करून नवीन पॉलिसी मध्ये पैसे गुंतवल्यास सात कोटी पेक्षा अधिक रक्कम दिली जाईल. फिर्यादींनी आलेल्या फोनवर विश्वास ठेवून वेगवेगळ्या बँकांमध्ये तब्बल ४,३९,५७,५३२ रुपये (चार कोटी 39 लाख 57 हजार 532) इतकी रक्कम जमा केले. मात्र समोरून अधिक पैशांची मागणी होऊ लागल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे ध्यानात येतात फिर्यादींनी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली केली

तक्रारीचे गांभीर्य घेत सायबर पोलिसांनी तपासासाठी पथक तयार केले आणि त्यांना दिल्ली ला रवाना केले. तपासा दरम्यान समजले की आरोपींची एकुण २७ बँकांमध्ये खाते आहे. त्यापैकी हैद्राबाद येथील एका बँक खात्यामध्ये ७१ लाख रूपये इंन्श्युरन्स पॉलिसीच्या मॅच्युरीटीच्या नावाखाली घेण्यात आलेली रक्कम होती. या मध्ये अनुजकुमार बालेश्वर सहा (२१) याला अटक करण्यात आले.

अनुजकुमार बालेश्वर सहा याने इंन्श्युरन्स पॉलिसीच्या नावाखाली फसवणुक करणाऱ्या टोळीशी संगनमत करून अनेकांची फसवणुक केलेली रक्कम स्वत:च्या खात्यामध्ये घेवून तो नोएडा परिसरातील विविध बँकांचे एटीएमद्वारे विथड्रॉव्हल करून संगनमताने विल्हेवाट लावत असे. तसेच संदिप कुमार लालताप्रसाद (२८) याला उत्तरप्रदेश येथून 14 जानेवारी रोजी अटक केली. हा विविध बँक खाते इतर आरोपींना देऊन प्रत्येकाला खात्यात 15 हजार रुपये गोळा करत असे. मागील एक वर्षाच्या काळात कर्ज मिळवून देण्याच्या आमिष दाखवून बोगस करार पत्र आणि आधार कार्ड वरील पत्ता बदलून नवीन सिम कार्ड घेऊन त्या आधारे बोगस खाती वर्षभरात उघडले.

या गुन्ह्याप्रकरणी या दोन आरोपींना अटक केली असून यानुसार सायबर पोलिसांनी कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(ब), ५०६, ३४ भादवि सह कलम ६६ (ड) भारतीय तंत्रज्ञान कायदा २०००-२००८ अन्वये गुन्हा नोंद केला. इतर तीन फरार आरोपींचा सायबर पूर्वप्रादेशिक पोलीस तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com