Last Chance for Ration Card Holders : ३० एप्रिलपूर्वी KYC पूर्ण न केल्यास मोफत लाभ बंद!
रेशनकार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने मोफत धान्य योजना (PDS) अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया बंधनकारक केली आहे. यासाठी अंतिम मुदत ३० एप्रिल २०२५ निश्चित करण्यात आली आहे. याआधी ही तारीख ३१ मार्च होती, परंतु नागरिकांना संधी देत ती सहाव्यांदा वाढवण्यात आली. सरकारने स्पष्ट केले आहे की ही शेवटची मुदत आहे आणि यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. जर लाभार्थ्यांनी या तारखेपर्यंत ई-केवायसी पूर्ण केले नाही, तर त्यांचे नाव रेशनकार्ड यादीतून हटवले जाईल आणि त्यांना मोफत धान्याचा लाभ मिळणार नाही.
ई-केवायसी म्हणजे "Know Your Customer" या प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांची ओळख अधिकृत रितीने पडताळली जाते. सरकारच्या माहितीनुसार, सुमारे २३.५% रेशनकार्डधारकांची पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही. अनेक अपात्र किंवा बनावट कार्डधारक योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खरे लाभार्थी आणि बनावट कार्डधारक यामधील फरक ओळखण्यासाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक ठरते.
ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत सोपी असून ती तुम्ही घरबसल्या मोबाईलद्वारेही करू शकता. यासाठी आपल्या राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तिथे ‘e-KYC for Ration Card’ के- वायसी या पर्यायावर क्लिक करून रेशन कार्ड क्रमांक, कुटुंबप्रमुखाचा आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल नंबर यांची माहिती भरावी लागते. मोबाइलवर आलेला ओटीपी OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करता येते. याशिवाय, ज्या लाभार्थ्यांना ऑनलाईन करता येत नाही, त्यांनी जवळच्या रेशन दुकानात जाऊन ई-पिओएस मशीनद्वारे अंगठ्याची पडताळणी करून ही प्रक्रिया पूर्ण करावी.
सरकारने जाहीर केलेल्या या अंतिम मुदतीनंतर कोणतीही संधी उरणार नाही. त्यामुळे सर्व रेशनकार्डधारकांनी तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा मोफत रेशन योजनेचा लाभ थांबण्याची शक्यता आहे. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या हक्काच्या धान्याचा पुरवठा सुरू राहावा, यासाठी वेळेवर आणि अचूक केवायसी करणे अत्यावश्यक आहे. ही माहिती आपल्या ओळखीतील लोकांपर्यंत जरूर पोहोचवा.
घरबसल्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया:
1. तुमच्या राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
2.‘e-KYC for Ration Card’ ई-केवायसी या पर्यायावर क्लिक करा.
3. तुमचा रेशन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक भरा.
4. कुटुंबप्रमुखाचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
5. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका.
6. सर्व माहिती तपासून Submit करा.
ई-पिओएस मशीनद्वारेही करता येईल केवायसी
ज्यांना ऑनलाईन करता येत नसेल, त्यांनी जवळच्या PDS दुकानात जाऊन ई-पिओएस मशीनद्वारे केवायसी पूर्ण करू शकतात. दुकानदार तुमचा आधार आणि अंगठा तपासून प्रक्रिया पूर्ण करेल.