Matthew Perry Passed Away: 'फ्रेंड्स' अभिनेता मॅथ्यू पेरीचा 54 व्या वर्षी मृत्यू; राहत्या घरी आढळला मृतदेह

Matthew Perry Passed Away: 'फ्रेंड्स' अभिनेता मॅथ्यू पेरीचा 54 व्या वर्षी मृत्यू; राहत्या घरी आढळला मृतदेह

नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन टीवी शो फ्रेंड्समधील चँडलरची भूमिका करणारा अभिनेता मॅथ्यू पेरीचे निधन झाले आहे.
Published by :
Team Lokshahi

नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन टीवी शो फ्रेंड्समधील चँडलरची भूमिका करणारा अभिनेता मॅथ्यू पेरीचे निधन झाले आहे. अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला आहे. मॅथ्यूचा मृतदेह घरातील जकुजीमधे बुडालेल्या अवस्थेत आढळला आहे. मात्र मृत्युचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Matthew Perry Passed Away: 'फ्रेंड्स' अभिनेता मॅथ्यू पेरीचा 54 व्या वर्षी मृत्यू; राहत्या घरी आढळला मृतदेह
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार चुरशीची लढत, कुणाचे पारडे जड?

अमेरिकन-कॅनडियन अभिनेता मॅथ्यू पेरी यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. अभिनेता त्याच्या लॉस एंजेलिस घरात मृतावस्थेत आढळला आहे. TMZ ने द्वारे अहवाल दिला की, मॅथ्यूचा मृत्यू हॉट टबमध्ये बुडल्यामुळे झाला.

तो Friends आणि 60 on the Sunset Strip सारख्या टीव्ही मालिकांसाठी ओळखला जातो. ही मालिका 22 सप्टेंबर 1994 रोजी सुरू झाली आणि 6 मे 2004 रोजी संपली. या काळात 236 भागांसह फ्रेंड्सचे दहा सीझन टेलिकास्ट झाले. त्याने फुल्स रश इन, ऑलमोस्ट हीरोज, द होल नाइन यार्ड्स, 17 अगेन आणि द रॉन क्लार्क स्टोरी यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com