धक्कादायक! उधारीचे पैसे परत न दिल्याने मित्रांनीच केली मित्राची हत्या

धक्कादायक! उधारीचे पैसे परत न दिल्याने मित्रांनीच केली मित्राची हत्या

कल्याण कोळशेवाडी भागातील तिसगांव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.

मयरेश जाधव, अंबरनाथ : कल्याण कोळशेवाडी भागातील तिसगांव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. उधारीचे पैसे परत न दिल्याने मित्रांनीच आपल्या मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आर्श्चयाची बाब म्हणजे आरोपीने हत्या करुन पोलीस स्टेशनमध्ये फोन करून मी माझ्या मित्राची हत्या केल्याचे सांगितले.

कल्याण कोळशेवाडी परिसरात राहणाऱ्या राजेश्वर पांडे यांनी व विपिन दुबे हे गेले पाच वर्षापासून एकमेकांना ओळखत असून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. काही दिवसापूर्वी विपिनला गरज असल्याने राजेश्वर पांडे यांनी त्याला उसनेवार पैसे दिले होते. मात्र त्यानंतर विपिन कडे आपल्या पैशाची मागणी केली असता नेहमी विपिन उडूवाडूचे उत्तर देत पैसे देण्यास नकार द्यायचा यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. आज दुपारच्या सुमारास राजेश्वर पांडे यांनी विपिन दुबेला आपल्या घरी पार्टी असून घरी येण्यास सांगितले व विपिनला मटन आणि दारूची पार्टी केली त्यानंतर आपल्या पैशाची मागणी केली. दारूच्या नशेती पैसे देत नसल्याचे सांगितल्याने संतप्त झालेल्या राजेश्वर ने धारदार हत्यांनी त्याची हत्या करून पोलीस स्टेशनमध्ये फोन करून मी माझ्या मित्राची हत्या केली असल्याचं सांगितल्या नंतर पोलीस घटनास्थळी पोचून आरोपीला अटक केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख करत आहेत.

धक्कादायक! उधारीचे पैसे परत न दिल्याने मित्रांनीच केली मित्राची हत्या
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर ‘पृथ्वी शॉ’ रुग्णालयात
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com