भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे…; नागपूरमध्ये लागले पोस्टर्स
Admin

भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे…; नागपूरमध्ये लागले पोस्टर्स

अनेकांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागत आहेत.

अनेकांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लागत आहेत. अशातच आता आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले पोस्टर लागले आहे. त्यामुळे आता चर्चा सुरु झाल्या आहेत.

आदित्य ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यापूर्वीच नागपूरमधील काही पोस्टर्स चर्चेचा विषय बनले आहे. नागपूरच्या रामटेक आणि कन्हान येथील रस्त्यांवर आणि बस स्टॉपवर हे पोस्टर्स लागले आहेत. ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे पोस्टर्स लावल्याचे समजते.

भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत. असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com