Online application for 11th admission
Online application for 11th admissionTeam Lokshahi

FYJC Admision: अकरावी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात, वाचा कसा कराल अर्ज

३० मेपासून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी केंद्रीभूत पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
Published by :
shweta walge
Published on

सोमवार ३० मेपासून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी केंद्रीभूत पद्धतीने ऑनलाइन प्रवेश (Online application for 11th admission) प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना ३० तारखेपासून अर्जाचा भाग १ भरता येणार आहे. केवळ केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्यांसाठी ही ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे. राज्यभरात अन्य ठिकाणी अकरावी प्रवेश प्रक्रिया प्रचलित पद्धतीने राबविली जाणार आहे

Online application for 11th admission
लोकशाहीचा ऑनलाइन सर्व्हे : महागाई, रोजगार निर्मितीत अपयशानंतरही जनतेला पुन्हा मोदीच पंतप्रधान हवेत

मुंबई महानगर (mumbai), नाशिक (Nashik),पुणे (Pune), पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर या महापालिका क्षेत्रांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी ऑनलाइन (Online application for 11th admission) केंद्रीभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. शिक्षण संचालनालयामार्फत या प्रवेश प्रक्रियेचे नियोजन जाहीर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना 30 मेपासून नावनोंदणी आणि ३० तारखेपासून म्हणजेच आजपासून अर्जाचा भाग १ भरता येणार आहे. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करून, लॉगइन आयडी व पासवर्ड मिळाल्यानंतर अर्जाचा भाग १ भरता येणार आहे. तर ऑनलाइन शुल्क भरून अर्ज लॉक करता येईल.

Online application for 11th admission
UPSC Result : श्रुती शर्मा देशात अव्वल, तर राज्यात प्रियंवदा म्हादळकरनं मारली बाजी

शिक्षण संचालनालयामार्फत जाहीर केलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्रेही जोडावी लागणार आहेत. अर्ज व कागदपत्रांच्या पडताळणीसाठी विद्यार्थ्याला शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राची मदत घेता येणार. ही प्रक्रिया ३० मेपासून दहावीचा निकाल लागेपर्यंत सुरू राहणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग भरण्यासाठी सुरुवात होणार असून, यामध्ये विद्यार्थ्याला प्रवेशासाठी त्याचा पसंतीक्रम नोंदवावा लागणार आहे.

असा भरा अर्जाचा भाग 1 –

-सर्वात आधी विद्यार्थ्यांनी https://11thadmission.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा.

– याठिकाणी विद्यार्थ्यांनी नोंदणी करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे.

– लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून इयत्ता 11वी प्रवेशासाठीच्या अर्जाचा भाग 1 भरायचा आहे.

– ऑनलाईन शुल्क भरून फॉर्म लॉक करायचा.

– त्यानंतर अर्ज प्रमाणित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्र निवडायचे आहे.

– मार्गदर्शन केंद्र किंवा माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी आपला अर्ज प्रमाणित करून घ्यायचा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com