FYJC Admission: अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी 'या' तारखेला होणार जाहीर
अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी येत्या 3 जुलै रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना 27 जून ते 29 जूनपर्यंत पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर केली आहे.
प्रवेशासाठी पात्र आणि निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालय स्तरावर 3 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. त्यामुळे या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 3 जुलै ते 5 जुलै दरम्यान प्रवेश निश्चित करता येणार आहे.कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पसंती 27 ते 29 जूनदरम्यान नोंदविता येणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना 3 जुलै ते 5 जुलै यादरम्यान ऑनलाइन प्रवेश करणे किंवा रद्द करणे महत्त्वाचे आहे. तसेच मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावे लागणार आहे.