ताज्या बातम्या
G20 Summit Delhi 2023 : G20 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात
G20 शिखर परिषद आजपासून म्हणजेच 9 सप्टेंबरपासून नवी दिल्लीत सुरू होत आहे.
G20 शिखर परिषद आजपासून म्हणजेच 9 सप्टेंबरपासून नवी दिल्लीत सुरू होत आहे. , या परिषदेसाठी सदस्य देशांचे प्रमुख 8 सप्टेंबरलाच नवी दिल्लीत पोहोचले आहेत.परिषदेची सुरुवात फोटो सेशनने होईल. त्यानंतर पंतप्रधान स्वागताचे भाषण करणार आहेत.
G-20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन भारतात दाखल झालेत. भारतात येताच काल संध्याकाळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.