जी 20 पर्यटन वर्किंग ग्रुपची आजपासून बैठक
Admin

जी 20 पर्यटन वर्किंग ग्रुपची आजपासून बैठक

जी 20 पर्यटन वर्किंग ग्रुपची आजपासून बैठक सुरु होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जी 20 पर्यटन वर्किंग ग्रुपची आजपासून बैठक सुरु होणार आहे. जी20 च्या पार्श्वभूमीवर काश्मिरमध्ये कडक बंदोबदस्त ठेवण्यात आला आहे. SKICC च्या दिशेने जाणारे दोन्ही रस्ते पुढील दोन दिवसांसाठी सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

या बैठकीत 25 देशातील 60 पेक्षा अधिक प्रतिनिधी तसेच जवळपास 100 पेक्षा अधिक पर्यटन क्षेत्राशी जोडलेले लोक सहभागी होणार आहेत. श्रीनगरच्या डल लेकमध्ये असलेल्या शेर - ए- काश्मिर इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरमध्ये (SKICC) ही बैठक होणार आहे. दुपारी 3 वाजल्यापासून बैठकीला सुरूवात होणार आहे.

यात काश्मिरच्या स्थानिक महिलांनी तयार केलेल्या सामानाचे देखील प्रदर्शन ठेवण्यात आले. काही देश बैठकीसाठी सहभागी नाही झाले तरी ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी बैठक होणार आहे. अशी माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com