Gaja Marne News : 277 दिवसांच्या कैदेनंतर गजा मारणेची सुटका,पोलिसांनी दिला दिलासा की इशारा?
जेल बाहेर येताच गजा मारणेचा लुक बदलला. 277 दिवस मारणे हा येरवडा आणि सांगलीच्या कारागृहात राहिला होता. अखेर गजा मारणेला आज विशेष मकोका न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर संध्याकाळी सव्वा सात वाजता गजानन मारणे हा येरवडा कारागृहातून बाहेर आला आणि तातडीने पोलीस त्याला पोलिस आयुक्त कार्यालयात गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्यासमोर हजर केला.
यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी गजा मारणेला न्यायालयाने दिलेल्या अटींचं पालन करण्याची सक्त ताकीद दिलेली आहे... तसेच पुणे शहरात न थांबता तातडीने बाहेर निघून जाण्याच्या सूचना दिल्यात.फेब्रुवारी महिन्यात कोथरूड भागामध्ये एका तरुणाला मारणे गॅंग मधील गुंडांनी मारहाण केली होती याच प्रकरणात गजा मारणे याच्यावरही मकोकांतर्गत कारवाई करण्यात आली होती.तब्बल 277 दिवस गजा मारणे हा कारागृहात होता. आज जेव्हा गजा मारणे हा कारागृह बाहेर आला तेव्हा गजा मारण्याचा लूकच बदलल्याचे दिसून आलं.
वाढलेली पांढरी दाढी या लूक मध्ये गजा मारणे दिसून आलाय... आता गजा मारणे न्यायालयाने दिलेल्या अटींचा पालन करतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.... जर अटींचा उलन केलं तर पुन्हा गजा मारणे याच्यावर कारवाई केली जाणार आहे तसेच गजा मारणे टोळीने कोणताही गुन्हा केला तर त्या गुन्ह्यात गजा मारणे यालाही आरोपी केली जाईल अशी ताकीद पोलिसांकडून देण्यात आली आहे.
