Ganesh Charlewar won from ward number 31 of Nagpur.
Ganesh Charlewar won from ward number 31 of Nagpur.

Ganesh Charlewar wins from ward number 31 of Nagpur : वडील महापालिकेत शिपाई, लेकाने रेशीमबागेत मारली बाजी

Ganesh Charlewar wins from ward number 31 of Nagpur : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी केली असून 151 पैकी 100 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून बहुमत मिळवले आहे.
Published on

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी केली असून 151 पैकी 100 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून बहुमत मिळवले आहे. मुंबईसह राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्येही भाजप-शिवसेना महायुती स्पष्ट आघाडीवर आहे. लातूर आणि कोल्हापूर वगळता इतर महापालिकांमध्ये भाजपने बाजी मारली आहे.

नागपूरच्या प्रभाग क्रमांक 31 मधून गणेश चर्लेवार विजयी झाले आहेत. त्यांचा वडील महापालिकेत शिपाई आहेत, तर गणेश आता नगरसेवक बनले आहेत. संघाच्या कट्टर स्वयंसेवक असलेल्या गणेशला भाजपने प्रतिष्ठेच्या रेशीमबाग प्रभागातून तिकीट दिले होते. विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजय साजरा केला.

नागपूरच्या 101 प्रभागांमध्ये भाजप आघाडीवर असून 38 जागांवर काँग्रेस समोर आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रभाग 21 मधून आभा पांडे यांच्यासह विजय नोंदवला आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेत भाजपचा बहुमत ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com