ताज्या बातम्या
पालकमंत्रिपदाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा, गणेश नाईक म्हणाले...
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर खातेवाटप झाले आता चर्चा सुरु झाली आहे ती पालकमंत्रिपदाची.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर खातेवाटप झाले आता चर्चा सुरु झाली आहे ती पालकमंत्रिपदाची. पालकमंत्रिपदावरुन आता रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पालकमंत्रिपदाबाबत राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गणेश नाईक म्हणाले की, महायुतीचे तीन पक्ष आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकत्र बसतील आणि सगळ्या गोष्टींची मांडणी करतील. एक जानेवारीनंतरच या सर्व गोष्टी होतील.
यासोबतच ते म्हणाले की, काम करायची इच्छा असेल ना तर तुम्ही पालकमंत्री नसतानासुद्धा तुम्ही तुमची वागण्याची, बोलण्याची पद्धत जर नीट ठेवली तर प्रत्येक खात्यातला अधिकारी तुमच्या सूचना नाकारणार नाही. असे गणेश नाईक म्हणाले.