MSRTC Ganeshotsav Gift : मुंबईतील कोकणी चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाचे गणेशोत्सव गिफ्ट

MSRTC Ganeshotsav Gift : मुंबईतील कोकणी चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाचे गणेशोत्सव गिफ्ट

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाची 5000 जादा गाड्यांची घोषणा
Published by :
Team Lokshahi
Published on

मुंबईतील कोकणी चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.त्यामुळे आता मुंबईमधील कोकणवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये कोकणातील लाखो चाकरमानी राहत आहेत. त्यांच्या हक्काच्या गणपती उत्सवासाठी त्यांना कोकणात जात यावे आणि त्यांचा हा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यादृष्टीने एसटी महामंडळाने मोठे पाऊल उचलल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा गणपती बाप्पाचे आगमन मागील वर्षीच्या मानाने लवकर होणार आहे. 27ऑगस्टला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात होणार असून त्या निमिताने एसटी महामंडळाने मोठी घोषणा केली आहे. एसटी महामंडळाने यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

नुकतीच यासंदर्भात एसटी महामंडळाची एक बैठक मंत्रालयात पार पडली. यावेळी बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.यावेळी प्रताप सरनाईक यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले की " कोकणचा चाकरमानी गणपती उत्सव आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे नफ्यातोट्याचा विचार न करता आम्ही यावर्षीही कोकणवासीयांसाठी 5000 ज्यादा गाड्या सोडणार आहोत. "

या ज्यादा बसेसमध्ये गट आरक्षणाचाही पर्याय दिलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे, अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के तिकिट दरात सवलत तर ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे गट आरक्षणाची सुरुवात 22 जुलैपासून करण्यात येणार आहे. 23 ऑगस्ट पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. बसेसचे आरक्षण एसटीच्या अधिकृत संकेतस्थळ npublic.msrtcors.com वर करता येऊ शकते . याशिवाय,थेट बसस्थानकांवरून किंवा MSRTC Bus Reservation ॲपव्दारे देखील आरक्षणाची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com