Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat LodhaTeam Lokshahi

आता विधवा महिलांना ‘या’ नावाने ओळखले जाणार - मंत्री मंगलप्रभात लोढा

राज्यभरातील विधवा महिलांना सन्मान मिळण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

राज्यभरातील विधवा महिलांना सन्मान मिळण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत.

आता विधवा महिलांना विधवा या नावाने नाहीतर त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी ‘गंगा भागिरथी’ या शब्दाचा वापर करावा असा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत.

लोढा यांनी पत्रात म्हटले आहे की, गंगा भागिरथी (गं.भा) हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन चर्चा करावी. असे प्रधान सचिवांना पत्र लिहिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com