Ajit Pawar
Ajit PawarAjit Pawar

Ajit Pawar : महापालिका निवडणुकीत वाद! आंदेकर कुटुंबाला तिकीट, अजितदादांनी अखेर सोडलं मौन म्हणाले...

Ajit Pawar : पुणे महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून तिकीट वाटपावरून राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना उमेदवारी देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

 Gangster Bandu Andekars family was given municipal election ticket Ajit Pawar first reaction : पुणे महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून तिकीट वाटपावरून राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना उमेदवारी देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावर टीका होत असतानाच अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, एखाद्या व्यक्तीवर आरोप असले तरी त्याच्या कुटुंबीयांना दोषी धरता येत नाही. एका माणसाच्या कृत्यासाठी संपूर्ण घराण्याला जबाबदार ठरवणं चुकीचं आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. उमेदवार निवड हा पक्षाचा निर्णय असतो आणि सहयोगी पक्षांना दिलेल्या जागांवर कोणाला उभं करायचं, हा त्यांचा अधिकार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. भाजप नेत्यांच्या प्रतिक्रियांवर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा हक्क आहे. तसेच त्यांनी पुणे महापालिकेच्या कारभारावरून भाजपवर टीकेची झोड उठवली. त्यामुळे येत्या काळात पुण्यातील राजकारण अधिकच रंगणार, हे स्पष्ट आहे.

थोडक्यात

  1. पुणे महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय वातावरण तापले.

  2. तिकीट वाटपावरून विविध पक्षांमध्ये वाद आणि चर्चा सुरू

  3. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना उमेदवारी देण्यात आली.

  4. या निर्णयामुळे राजकीय वाद निर्माण झाला.

  5. विरोधकांकडून तसेच काही स्तरांतून टीका व्यक्त करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com