Ganpat Gaikwad : गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

Ganpat Gaikwad : गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर करण्यात आले होते
Published by :
shweta walge

उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. पण अवघ्या काही मिनिटांत गणपत गायकवाड यांना कोर्टातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. 

पोलिसांनी गायकवाड यांना 14 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्याची चौकशी करायची आहे. गायकवाड यांच्या आवाजाचे नमुनेही घ्यायचे आहेत, त्यामुळे 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. कोर्टाने ही मागणी मान्य केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com