एफपीओ गुंडाळण्यामागचं गौतम अदाणींनी सांगितले कारण; म्हणाले...
Admin

एफपीओ गुंडाळण्यामागचं गौतम अदाणींनी सांगितले कारण; म्हणाले...

अदानी एंटरप्रायझेसने 20,000 कोटी रुपयांचे फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) रद्द केल्याची घोषणा केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अदानी एंटरप्रायझेसने 20,000 कोटी रुपयांचे फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) रद्द केल्याची घोषणा केली आहे. बुधवारी रात्री उशिरा ही घोषणा करताना कंपनीने सांगितले की या एफपीओचे सर्व पैसे गुंतवणूकदारांना परत करणार आहेत. अदानी समुहानं नुकताच अदानी एंटरप्राइजेज याचा FPO जारी केला होता. 31 जानेवारीपर्यंत गुंतवणूकधारकांना पैसे गुंतवण्याची संधी दिली होती. पण कंपनीनं एफपीओ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली, कंपनीमधील सदस्यांच्या हितासाठी एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला. अदानी समूहाकडून गुंतवणूकधारकांना पैसे परत दिले जाणार आहेत.

गौतम अदाणी म्हणाले की, “गेल्या ४० वर्षांच्या आमच्या प्रवासात मला सर्वच भागधारकांचा चांगला पाठिंबा मिळाला आहे. विशेषत: गुंतवणूकदारांनी मला पाठिंबा दिलाय. मी आयुष्यात जे काही मिळवलं आहे, ते त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच आहे. माझ्या यशासाठी तेच कारणीभूत आहेत.माझ्यासाठी माझ्या गुंतवणूकदारांचं हित हे सर्वात महत्त्वाचं आहे. इतर सर्वकाही दुय्यम आहे. गुंतवणूकदारांना संभाव्य नुकसानापासून वाचवण्यासाठी आम्ही एफपीओ मागे घेतला आहे” असे त्यांनी सांगितले.

“मित्रहो, आमचे एफपीओ पूर्णपणे विक्री झाल्यानंतर काल आम्ही ते एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. पण काल शेअर बाजारात निर्माण झालेली अस्थिरता पाहाता आमच्या बोर्डाला असं वाटलं की या एफपीओचे व्यवहार अशाच प्रकारे सुरू ठेवणं नैतिकतेला धरून राहणार नाही”.

“मी माझ्या गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना धन्यवाद देतो की त्यांनी या एफपीओला उत्तम प्रतिसाद दिला. गेल्या आठवड्यात शेअर बाजारातल्या अस्थिरतेनंतरही तुमचा अदानी समूहावरील विश्वास आम्हाला धीर देणारा आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्हाला भविष्यातही असाच पाठिंबा मिळत राहील. आमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद” एकदा शेअर बाजार स्थिर झाला की आम्ही आमच्या निर्णयांचा पुनर्विचार करू. आमचा प्रत्येक व्यवसाय जबाबदार पद्धतीने संपत्ती बनवण्यासाठी प्रयत्नशील राहील”. असे गौतम अदानी म्हणाले.

एफपीओ गुंडाळण्यामागचं गौतम अदाणींनी सांगितले कारण; म्हणाले...
अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी एंटरप्रायझेसने ‘एफपीओ’ प्रक्रिया रद्द करण्याचा घेतला निर्णय
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com