Ruckus in Gautami Patil Show
Ruckus in Gautami Patil Show

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांचा लाठीचार्ज

गौतमी पाटील हिच्या अहमदनगर येथील कार्यक्रमात तुफान राडा झाला. हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज करावा लागला.

अहमदनगर : लावणी डान्सर गौतमी पाटील ही कायमच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही. असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. गौतमी पाटील हिच्या अहमदनगर येथील कार्यक्रमात तुफान राडा झाला. हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज करावा लागला.

नेमकं काय घडलं?

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने तरुणांची उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रम ऐन जोमात असताना काही प्रेक्षकांनी गौतमीवर पैशाची उधळण सुरू केली. त्यामुळे गौतमीने नाराजी व्यक्त करत डान्स थांबवला आणि स्वतः माईक हातात घेत प्रेक्षकांना गोंधळ न करण्याची विनंती केली.

राडा होण्याचं कारण काय?

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे गुरुवारी (23 फेब्रुवारी) रात्री गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. मात्र गौतमीचा डान्स सुरु होताच काही प्रेक्षकांनी तिच्यावर पैशांची उधळण सुरु केली. त्यामुळे गौतमीने नाराजी व्यक्त करत डान्स थांबवला आणि स्वतः माईक हातात घेत प्रेक्षकांना गोंधळ न करण्याची विनंती केली. गौतमीने डान्स थांबवल्याने प्रेक्षकांनी कल्ला करत तुफान राडा घातला. अतिउत्साही प्रेक्षकांना नियंत्रित करताना 60 बाऊन्सरसह आयोजकांची चांगलीच दमछाक झाली. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com