Gautami Patil on Ajit Pawar
Gautami Patil on Ajit Pawar

Gautami Patil on Ajit Pawar : दादा मला माफ करा, गौतमी पाटीलने मागितली अजित पवारांची माफी; काय आहे प्रकरण?

अजितदादांच्या इशाऱ्यानंतर खुद्द गौतमी पाटीलने प्रतिक्रिया देत दादांची हात जोडून माफी मागितली आहे.

पंढरपूर : अभिराज उबाळे | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गौतमी पाटील या नावाची चर्चा आहे. गौतमीच्या डान्सने तरुणांना अक्षरश: वेड लावलं आहे. लावणी नृत्य सादर करत असताना अश्लील हावभाव व इशारे केल्यामुळे लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्यावर टीका होत होती. मात्र गौतमीने आपण आपल्या सादरीकरणामध्ये सुधारणा केल्याचे गौतमी पाटील हिने सांगितले होते. तरीही काही ट्रोलर्स गौतमीला ट्रोल करत असतात.

एकीकडे अशी स्थिती असताना विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनीही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर भाष्य केले होते. यापुढे राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करू नका, अशी तंबी दिली होती. आता यावर गौतमीने दादांना उद्देशून आवाहन केले आहे.राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली होती. पदाधिकाऱ्यांसह झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी बैठकीत अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी गौतमी पाटीलच्या अश्लील नृत्याच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार केली होती.

Gautami Patil on Ajit Pawar
Bigg Boss 16 Winner Mc Stan : रॅपर एमसी स्टॅन बिग बॉस 16 चा विजेता

यानंतर अजित पवार यांनी मोठा निर्णय घेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या, त्यानुसार, लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला राष्ट्रवादी पक्षात बंदी घालण्यात येणार आहे. राज्यभरात कुठेही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या.

गौतमी पाटील काय म्हणाली?

अजित पवारांच्या या आदेशानंतर गौतमी पाटीलने अजित पवार यांची थेट माफी मागितील. गौतमी म्हणाली की, 'दादा खूप मोठे आहेत. दादांना मी काही बोलू शकत नाही. माझं एकच म्हणणं आहे. मी माफी मागितली होती. माझ्याकडून चुका झाल्या. तरीही अजूनही लोक मला ट्रोल करीत आहेत. ते कोण आहेत, हे मला माहिती नाही. लोक माझे जुने व्हीडिओ टाकत आहेत. माझी प्रसिद्धी काहींना पहावत नाही, असं गौतमी म्हणाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com