गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

सातारा न्यायालयाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

सातारा न्यायालयाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या डान्समध्ये ती अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप प्रतिभा शेलार यांनी करत तक्रार दाखल केली होती. गौतमीने कार्यक्रमात केलेला अश्लील डान्स पाहून चहू बाजूने तिच्यावर टीका होत होती. त्यामुळे गौतमीने पुढे स्वत: या बाबद माफी मागितली. मला लावणीची संस्कृती मोडायची नाही. जे झाले त्यासाठी मी सर्वांची माफी मागते. असे गौतमीने म्हटले आहे.

सध्या गौतमीच्या कार्यक्रमांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यात अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता सातारा कोर्टाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

'घुंगरु' असे तिच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा झाली असून या सिनेमाचं शूटिंग महाराष्ट्रातील विविध गावांसह परदेशातदेखील झालं आहे. या सिनेमात गौतमी नक्की कोणतं पात्र साकारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com