कोयनेतून तिसर्‍यांदा पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती

कोयनेतून तिसर्‍यांदा पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती

एरवी हिवाळ्यात राज्यामध्ये विजेची मागणी कमी असते. परंतु मागील काही दिवसांपासून विजेची मागणी वाढली आहे.

निसार शेख| शिरगाव: कोयना प्रकल्पातून गेले दोन दिवस पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती केली जात आहे. पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प चालविण्याची ही तिसरी वेळ आहे. महानिर्मिती कंपनीने मागील दोन दिवसांत आठ हजार अतिरिक्त मेगावॅट वीजनिर्मिती केली. कोयना प्रकल्पाने यामध्ये महत्वाची भूमिका निभावली. त्यामुळे साठीनंतरही कोयना प्रकल्प वीजनिर्मितीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एरवी हिवाळ्यात राज्यामध्ये विजेची मागणी कमी असते. परंतु मागील काही दिवसांपासून विजेची मागणी वाढली आहे. राज्यात विजेची मागणी असते, त्यावेळेला कोयना प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जाते. साधारण सकाळ आणि संध्याकाळी विजेची मागणी वाढते. त्याचवेळी ही वीजनिर्मिती केली जाते. पोफळी, अलोरे, कोळकेवाडी येथे कोयना प्रकल्पाचे वीजनिर्मितीचे एकूण चार टप्पे आहेत. कोयना धरण पायथ्यापासून पश्‍चिम महाराष्ट्रात सिंचनासाठी पाणी सोडले जाते. त्याही पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. एकूण १९५६ मेगावॅट वीजनिर्मिती कोयना प्रकल्पातून केली जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com