Australia Cricket Team
Australia Cricket Team

टी-२० वर्ल्डकपमध्ये दिसणार ऑस्ट्रेलियाची जादू, तीन फिरकीपटू उतरणार मैदानात? जॉर्ज बेली म्हणाला...

आगामी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी कंबर कसायला सुरुवात केली आहे.
Published by :

आगामी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटने गुरुवारी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली. यामध्ये २३ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या लिस्टमध्ये अ‍ॅश्टन एगरला स्थान मिळालं नाहीय. ऑस्ट्रेलिया पुरुष निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी याबाबत मोठं विधा केलं आहे. एश्टन वेस्टइंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सामील होण्यासाठी एक मजबूत दावेदार आहे.

जॉर्ज बेलीने आयसीसीशी बोलताना म्हटलं की, एडम जॅम्पा आणि ग्लेन मॅक्सवेलशिवाय आमच्याकडे आणखी एका फिरकीपटूला सामील करण्याचा विकल्प आहे. १५ सदस्यांच्या लिस्टमध्ये त्याचा समावेश होऊ शकतो. ग्लेन मॅक्सवेलला पार्ट टाईमरची भूमिका देण्याची आवश्यकता नाहीय. तो असा एक खेळाडू आहे, जो आमच्यासाठी फ्रंटलाईन विकल्प आहे. अ‍ॅडम झॅम्पासोबत आणखी एक फिरकीपटू मैदानात उतरेल, असं मला वाटतं.

बेली पुढे म्हणाला, आगामी होणाऱ्या टूर्नामेंटसाठी एप्रिलमध्ये संघ बनवण्याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. यामध्ये स्टॉयनिस आणि अ‍ॅश्टन एगर सामील होण्याची दाट शक्यता आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेण्याच्या शर्यतीत फिरकीपटू अ‍ॅश्टन एगर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४८ विकेट्स घेतल्या आहेत. तर अ‍ॅडम झॅम्पाने सर्वात जास्त विकेट घेतल्या आहेत. या फॉर्मेटमध्ये त्याच्या नावावर ९२ आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. एगरने २०२२ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये श्रीलंकाविरोधात शेवटचा सामना खेळला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com