Hinduphobia Bill : अमेरिकेतील 'या' राज्याने हिंदूफोबियाविरोधात विधेयक केलं सादर
जॉर्जिया राज्य 'हिंदूफोबिया' विरोधात विधेयक सादर करणारे पहिले अमेरिकन राज्य ठरले आहे. 'SB 375' या ऐतिहासिक विधेयकाच्या माध्यमातून हिंदुविरोधी भेदभावाला कायद्याच्या चौकटीत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या विधेयकाला रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक दोन्ही पक्षांच्या सिनेटर्सचा पाठिंबा लाभला आहे. हिंदू धर्मीयांवरील पूर्वग्रह, द्वेष आणि अन्यायाला रोखण्यासाठी जॉर्जिया राज्याने उचललेले हे पाऊल अमेरिकेतील हिंदू समुदायासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.
सध्या अमेरिकेतील हिंदू लोकसंख्या सुमारे 25 लाख (0.9%) आहे. दरम्यान, कॅलिफोर्नियात मांडण्यात आलेल्या 'SB 509' विधेयकाला हिंदू संघटनांनी विरोध दर्शवला आहे.
काय आहे 'SB 375' विधेयक?
'SB 375' हे विधेयक जॉर्जियाच्या दंड संहितेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून हिंदूफोबिया ही संज्ञा कायदेशीरपणे मान्य होईल आणि कायदा अंमलबजावणी संस्था त्यानुसार कारवाई करू शकतील.
विधेयकातील महत्त्वाचे मुद्दे
भेदभावाच्या केसेसमध्ये हिंदूफोबिया विचारात घेता येणार
कायद्यात ‘हिंदूविरोधी द्वेष’ स्पष्टपणे नमूद होणार
दोषीवर कठोर कारवाईसाठी कायद्यात सुधारणा