German Bakery : जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला 13 वर्ष पूर्ण

German Bakery : जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला 13 वर्ष पूर्ण

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसर हा श्रीमंतांचा परिसर मानला जातो.

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसर हा श्रीमंतांचा परिसर मानला जातो. शिवाय या परिसरात ओशो आश्रम आहे. त्यामुळे या परिसरात अनेक विदेशी नागरीक यायचे. 1989 मध्ये पुण्यातील एका मराठी माणसाने जर्मन बेकरी सुरु केली होती. ज्ञानेश्वर नारायण खरोसे असं त्या पुणेकराचं नावं आहे. जर्मनीतला वुडी नावाचा कूक बोलवून ज्ञानेश्वर यांनी ही बेकरी सुरु केली होती.

कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी येथे १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी झालेल्या बॉम्बस्फोटात १७ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. तर, ५६ नागरिक गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच व जखमींमध्ये १० परदेशी नागरिकांचा समावेश होता. पुण्यातल्या जर्मन बेकरीचं नाव एकाच क्षणात वेगळ्याचं कारणाने जगभरात पोहचलं होतं. पुण्यात यापूर्वी दोन किरकोळ स्फोट घडवण्यात आले होते. दहशतवाद्यांना अटकही झाली होती.

हसत खेळत असणाऱ्या लोकांचा जोरात आरडाओरड सुरु झाली.13 वर्षापूर्वी जर्मन बेकरी परिसरात संध्याकाळी सातच्या सुमारास आरडाओरड सुरु झाली. किंकाळ्या उठल्या. लोक सैरावैरा धावत सुटले होते. सुरुवातील साध्या सिलेंडरचा स्फोट झाला असं अनेकांना वाटलं मात्र हा साधासुधा स्फोट नसून तो दहशतवाद्यांनी घडवलेला स्फोट होता. आज याच हल्ल्याला 13 वर्ष पूर्ण झाली मात्र या हल्ल्याच्या आठवणी अजूनही जर्मन बेकरीच्या मालकांच्या मनात ताज्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com