घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे अजूनही बेपत्ता

घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे अजूनही बेपत्ता

घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे अजूनही बेपत्ता आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे अजूनही बेपत्ता आहे. भावेश भिंडेच्या मागावर मुंबई पोलिसांची 7 पथकं आहेत. भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात आढळल्याची माहिती मिळत आहे. घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिंडे राज्याबाहेर पळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी भावेश भिंडे आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांना त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळा येथे असल्याचे समजले. पोलिसांचे पथक लोणावळ्यात पोहचण्यापूर्वीच त्याने मोबाईल बंद केला असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com