घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला आज कोर्टात हजर करण्यात येणार

घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला आज कोर्टात हजर करण्यात येणार

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं.
Published by :
Siddhi Naringrekar

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला.

याच पार्श्वभूमीवर आता आरोपी भावेश भिंडेची आज पोलीस कोठडी संपणार आहे. आज पुन्हा भावेश भिंडेला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. भावेश भिंडेला आज किला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

भावेश भिंडेच्या अडचणीत वाढ होणार की दिलासा मिळणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. तर भिंडेला पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात येणार की न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com