घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 16 जणांचा मृत्यू

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 16 जणांचा मृत्यू

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
Published on

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं.

या घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर गेला असल्याची माहिती मिळत आहे. होर्डिंगच्या सांगाड्याखाली आणखी 2 मृतदेह सापडले आहेत. पालिका आयुक्त भूषण गगराणींकडून घटनास्थळाची पाहणी केली आहे.

घाटकोपर घटनास्थळी गेल्या ५० तासांपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. एनडीआरएफ श्वानाच्या मदतीने मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत आहेत अद्याप काही मृतदेह या मलब्याखाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com