घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 14वर; 43 जणांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 14वर; 43 जणांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं.

या घटनेत आता मृतांचा आकडा 14वर पोहचला असून 43 जणांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत जवळपास 74 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

यात आता मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत असून होर्डिंगखाली अडकलेल्यांना काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com