Rishiraj Sawant : ऋषीराज सावंत यांच्या अपहरणावर गिरीराज सावंत यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

Rishiraj Sawant : ऋषीराज सावंत यांच्या अपहरणावर गिरीराज सावंत यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

गिरीराज सावंत यांनी ऋषीराज सावंत यांच्या अपहरण प्रकरणावर मोठा खुलासा केला आहे. संपूर्ण बातमी वाचा.
Published by :
Prachi Nate
Published on

राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण पुणे विमानतळावरुन झालं असून त्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. तानजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच, पुणे पोलिस विमानतळावर दाखल झाले. याप्रकरणी आता पोलिस तपास सुरु करण्यात आला असून या तपासादरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, तानाजी सावंत यांचा मुलगा नाराजीमधून मित्रांसोबत परदेशात गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऋषीराज सावंत हे परदेशात सुखरुप असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. याचपार्श्वभूमिवर त्यांचे भाऊ गिरीराज सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गिरीराज सावंत काय म्हणाले?

गिरीराज सावंत यांनी या प्रकरणाचा खफलासा करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे म्हणाले, काल साधारण तीनच्या सुमारास आम्हाला एक धक्कादायक मेसेज आला. हा मेसेज माझ्या छोट्या भावाचा होता. तो मेसेजमध्ये म्हणाला की, मी दोन दिवसांसाठी बाहेर जातो आहे, पण आधी असं कधीच झालं नव्हतं. बाहेरगावी असो किंवा परदेशी, आम्ही एकमेकांना सांगूनच जातो. आठ ते दहा दिवसांपूर्वीच तो दुबईला गेला होता. तिथून तो सहा-सात दिवसांनी आला आणि अचानक फोन स्वीच ऑफ करुन निघून गेला, असं गिरीराज यांनी सांगितलं.

तानाजी सावंत काय म्हणाले?

माझ्या मुलाचे अपहरण झाले नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आहेत. त्याचा फोन न आल्याने मला खुप काळजी वाटू लागली. आम्ही एकमेकांना दिवसांतून वीस फोन तरी करतो. मात्र तो अचानक विमानतळावर का गेला? या काळजीपोटी मी पोलिस आयुक्त व अधिकाऱ्यांना फोन केला. ते तिघंही खासगी विमानाने गेले आहेत. त्याच्या मित्रांची नावंदेखील माहीत नाहीत. आमच्यामध्ये नेहमीच संवाद होतो. मात्र आज त्याच्याबरोबर काहीही बोलणं झालं नाही त्यामुळे मी घाबरलो आणि अस्वस्थ झालो".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com